प्रविण तरडेने शेताच्या बांधावर साजरा केला वडिलांचा 78 वा वाढदिवस, फोटो पाहून वाटेल कौतुकास्पद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 01:14 PM2020-06-27T13:14:04+5:302020-06-27T13:19:24+5:30

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मुळशी तालुक्यातील जातेडे या त्यांच्या गावात आज त्यांनी वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, बंधू योगेश तरडे आणि कुटुंबियांसमवेत भात लावणी केली.

Praveen Tarde celebrates his father's 78th birthday on a farm dam, photos will be appreciated | प्रविण तरडेने शेताच्या बांधावर साजरा केला वडिलांचा 78 वा वाढदिवस, फोटो पाहून वाटेल कौतुकास्पद

प्रविण तरडेने शेताच्या बांधावर साजरा केला वडिलांचा 78 वा वाढदिवस, फोटो पाहून वाटेल कौतुकास्पद

googlenewsNext

'शेती विकायची नसते ती राखायची असते' असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मुळशी तालुक्यातील जातेडे या त्यांच्या गावात आज त्यांनी वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, बंधू योगेश तरडे आणि कुटुंबियांसमवेत भात लावणी केली. यावेळी त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर यांनीही हातभार लावला. 

भात लावणी आणि वडील विठ्ठल तरडे यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना प्रविण तरडे म्हणाले की, सध्या लॉकडाऊन मुळे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत यामुळे मी आपल्या कुटुंबियांसोबत शेतात भात लावणी करायला आलो आहे. तसेच कोरोनामुळे यंदा वारी झाली नाही यामुळे आई – वडील शेतात राबत आहेत, अन्यथा ते शेतातील कामं आटोपून वारीला निघालेले असतात.

पुण्या – मुंबईत कामासाठी गेलेल्या प्रत्येकाने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपावे असे सांगत आपलं शेत आपण कसले पाहिजे असंही ते म्हणाले. तसेच त्यांनी कोरोना, कोविड १९ आणि  लॉकडाऊनच्या काळात शेतकरी ज्या पद्धतीने कष्ट करतो आहे त्याला यावेळी सलाम केला.

 मराठीतील भव्यदिव्य असा ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.  

Web Title: Praveen Tarde celebrates his father's 78th birthday on a farm dam, photos will be appreciated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.