05:42 PM
उन्नाव बलात्कार प्रकरणः न्याय मिळालाच पाहिजे, कठोर कायदे बनवण्याची गरज आहे जेणेकरून आरोपींनी लवकरात लवकर शिक्षा होईल; तेलंगणा बलात्कार पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया
04:30 PM
यवतमाळ : घराच्या जागेच्या वादातून दाम्पत्याची कोयत्याने वार करून हत्या. तिवसा (ता.यवतमाळ) येथील शनिवारी दुपारी ३ वाजताची घटना. रघुनाथ हरिदास जाधव (५५) व अनुसया रघुनाथ जाधव (४५) अशी मृतांची नावे
04:20 PM
बुलडाणा: पत्नीच्या नावावरील शेतीचा फेरफार देण्यासाठी माजी सैनिकाकडून तीन हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना सुनील आत्माराम डव्हळे (३३) या तलाठ्यास अटक
04:16 PM
धुळे : शहरात आझाद नगर पोलिसांनी लक्झरी बसमधून १ लाखाचा गुटखा हस्तगत केला
03:41 PM
हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
03:06 PM
सोलापूर : स्कूल बसची दुचाकीला धडक; लहान मुलांसह दोघे गंभीर जखमी, पंढरपूर शहरातील घटना.
02:39 PM
मुंबईः चुनाभट्टीत भरधाव कारची तरुणीला धडक; दोन जणांना अटक तर एकजण फरार