अभिनेत्री प्रार्थनाचे लहानपणीचे फोटो पाहिलेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:16 PM2020-04-15T18:16:18+5:302020-04-15T18:24:11+5:30

प्रार्थनच्या फॅन्सनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prarthana behere share her childhood photo on social media gda | अभिनेत्री प्रार्थनाचे लहानपणीचे फोटो पाहिलेत का ?

अभिनेत्री प्रार्थनाचे लहानपणीचे फोटो पाहिलेत का ?

googlenewsNext

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. प्रार्थना  तिच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच क्युट दिसते आहे. वेगवेगळ्या पोझेस देताना या फोटोंमध्ये प्रार्थना दिसते आहे. प्रार्थनच्या फॅन्सनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.


प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

Web Title: Prarthana behere share her childhood photo on social media gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.