प्राजक्ता माळीचा हा फोटो पाहून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात, चाहते म्हणाले, एक नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 07:15 AM2019-09-03T07:15:00+5:302019-09-03T07:15:00+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

Prajakta mali share her news photo on instagram | प्राजक्ता माळीचा हा फोटो पाहून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात, चाहते म्हणाले, एक नंबर

प्राजक्ता माळीचा हा फोटो पाहून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात, चाहते म्हणाले, एक नंबर

googlenewsNext

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. . प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपल्या पर्सनल लाईफ आणि तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात. 


प्राजक्ताने नुकतंच इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. हा फोटो शेअर करुन प्राजक्ताने लिहिले की, रेट्रो लूक.  


मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे. 

Web Title: Prajakta mali share her news photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.