प्राजक्ताचा साडीतला फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी, म्हणाले लईच भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:56 PM2019-08-07T15:56:01+5:302019-08-07T16:03:02+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

Prajakta mali look stunning in saree | प्राजक्ताचा साडीतला फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी, म्हणाले लईच भारी

प्राजक्ताचा साडीतला फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी, म्हणाले लईच भारी

googlenewsNext

छोट्या पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताने आपल्या अभिनयाची मोहिनी दोनहीकडे घातली. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी  आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात. नुकताच प्राजक्ताने तिचा साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. साडीत प्राजक्ताच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. ''तू एवढी भारी आहेस की मला परत परत तूच आवडतेस.'' अशा पद्धतीच्या कमेंट्स तिच्या फॅन्सकडून फोटोवर येत आहेत. 


मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे. 

Web Title: Prajakta mali look stunning in saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.