लाल रंगाच्या साडीत खुललं पूजाचे सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:21 PM2019-10-30T12:21:00+5:302019-10-30T12:37:30+5:30

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

Pooja sawant share her saree photo on instagram | लाल रंगाच्या साडीत खुललं पूजाचे सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

लाल रंगाच्या साडीत खुललं पूजाचे सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

googlenewsNext

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. नुकताच पूजाने लाल रंगाच्या साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. साडीत पूजाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला आहे.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.
 

Web Title: Pooja sawant share her saree photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.