पूजा सावंतचे हे ग्लॅमरस रूप पाहून तुम्ही व्हाल तिच्यावर फिदा, पाहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 07:26 PM2019-06-20T19:26:46+5:302019-06-20T19:28:06+5:30

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.

Pooja Sawant share glamorous photos on her instagram | पूजा सावंतचे हे ग्लॅमरस रूप पाहून तुम्ही व्हाल तिच्यावर फिदा, पाहा तिचे हे फोटो

पूजा सावंतचे हे ग्लॅमरस रूप पाहून तुम्ही व्हाल तिच्यावर फिदा, पाहा तिचे हे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देपूजाने नुकतेच एक फोटोशूट केले असून जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिचा ग्लॅमरस अवतार तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या फोटोतील तिची हेअर स्टाईल देखील खूपच छान असून तिने एक सुंदर क्लच हातात पकडला आहे.

पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटात पूजाचा एक वेगळा अंदाज तिच्या फॅन्सना पाहायला मिळाला होता. 

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. ती या माध्यमांद्वारे आपल्या चाहत्यांशी गप्पा मारते. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते. सोशल मीडियावर पूजाचे नेहमीच हटके अंदाजातील फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

पूजाने नुकतेच एक फोटोशूट केले असून जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिचा ग्लॅमरस अवतार तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या फोटोतील तिची हेअर स्टाईल देखील खूपच छान असून तिने एक सुंदर क्लच हातात पकडला आहे. तसेच या फोटोत तिने घातलेले एअर रिंग आणि ब्रेसलेट देखील खूपच छान आहे. या सगळ्या गोष्टींमुळे पूजाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. 

पूजा या फोटोत एखाद्या राजकुमारी सारखी दिसत असल्याचे तिचे फॅन्स तिला प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत तर काहींना ती त्यांच्या स्वप्नातील ड्रीम गर्ल वाटत आहे. पूजाने हे फोटो पोस्ट करून केवळ काहीच तास झाले असले तरी तिच्या फोटोंना ३६ हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. 

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पूजाच्या या फोटोवर होत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंतची आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते.  

Web Title: Pooja Sawant share glamorous photos on her instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.