पूजा सावंत या कारणामुळे गश्मिर महाजनच्या प्रेमात, सोशल मीडियावर म्हणाली Love You मित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 10:41 AM2021-02-15T10:41:42+5:302021-02-15T10:44:45+5:30

पूजा सावंत मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यांचे दोघांचे चॅटींगही व्हायरल झाले होते.

Pooja Sawant fell in love with Gashmir Mahajan for this reason, said Love You Mitra on social media | पूजा सावंत या कारणामुळे गश्मिर महाजनच्या प्रेमात, सोशल मीडियावर म्हणाली Love You मित्रा

पूजा सावंत या कारणामुळे गश्मिर महाजनच्या प्रेमात, सोशल मीडियावर म्हणाली Love You मित्रा

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पूजा सावंतने थेट गश्मिरला लव्ह यु म्हटल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. सोशल मीडियावर दोघांचे चॅटींगही व्हायरल झाले होते, या चॅटींगच्या मागचे कारण आता समोर आले आहेत.  'लव्ह यू मित्रा' नावाचा सिनमा आहे. पूजा सावंत, गश्मीर महाजनी हे प्रमुख भूमिकेत असून आणखी एका कलाकारचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता हा तिसरा कलाकार कोण असणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

"अशा प्रकारचा विषय मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच हाताळण्यात आला आहे, हा सिनेमा आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत नक्कीच पाहू शकता'', अशी प्रतिकिया चित्रपटाच्या दिग्दर्शक मानसी बागला यांनी दिली. तर चित्रपटाचे निर्माता वरुण बागला त्यांच्या अनुभवाबद्दल सांगतात, ''निर्मिती क्षेत्रातील हा माझा पहिला चित्रपट असला तरी माझी संपूर्ण टीम अनुभवी आहे.

 

चित्रपटात पूजा सावंत, गश्मीर महाजनी यांच्यासह एम टाऊनमधील कसलेल्या कलाकारांचा सहभाग आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा खूपच सुखद अनुभव आहे आणि चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर 'लव्ह यू मित्रा' हा प्रेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा सिनेमा आहे. आजच्या तरुणाईला आवडेल आणि एकविसाव्या शतकातील पुरोगामी आणि प्रयोगशील पिढीला आपलासा वाटेल, असा विषय आणि विचार मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.''

दिग्दर्शकीय पदार्पणासाठी पूजानेही मानसी बागला यांना शुभेच्छा दिल्या असून या चित्रपटाची ती आतुरतेने वाट बघत असल्याचेही तिने सांगितले. तर गश्मीर म्हणतो,'' ही स्क्रिप्ट वाचतानाच माझ्या मनाला खूप भावली. त्यात एक वेगळेपण आहे. चित्रपटाचा आशय अतिशय प्रगल्भ आहे . मिनी फिल्म आणि संपूर्ण टीमला माझ्या खूप शुभेच्छा!''

चित्रपटाचं नाव आणि पोस्टरवरून त्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे हे नक्की. पूजा आणि गश्मिर च्या चाहत्यांसाठी ही एक अप्रतिम भेटच ठरणार आहे.  'लव्ह यू मित्रा'ची मूळ संकल्पना जरी प्रेमकथेवर आधारित असली तरी हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असा आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.
 

 

Web Title: Pooja Sawant fell in love with Gashmir Mahajan for this reason, said Love You Mitra on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.