'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर. रिल लाइफमध्ये ऑनस्क्रीन पत्नी राधिकाशी पटत नसलं तरी रिअल लाइफ पार्टनर म्हणजेच त्याची पत्नी सुखदा खांडकेकर हिच्यावर अभिजीतचं जीवापाड प्रेम आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सोशल मीडियावर सुखदा अॅक्टीव्ह असते. तिच्या चाहत्यांसह तिचे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. फोटोत तिचा हॉट आणि तितक्याच बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे. सोशल मीडियावर सुखदाचा हा फोटो व्हायरल होतोय. पूर्णपणे बॅकलेस असून सुखदाच्या घायाळ करणा-या मादक अदा आणि बोल्ड अंदाज सा-यांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत.

 

फेसबुकच्या माध्यमातून दोघं पहिल्यांदा भेटले. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही मूळचे नाशिकचे. अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते. त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमुळे अभिजीत रसिकांचा लाडका बनला होता.

ही मालिका पाहून सुखदाने फेसबुकवर अभिजीतचं कौतुक केले होते. नाशिकचा मुलगा मालिकेत एवढं चांगलं काम करतो आहेस, हे कौतुकास्पद आहे अशा शब्दांत सुखदाने फेसबुकवर अभिजीतवर स्तुतीसुमनं उधळली होती. यानंतर अभिजीत आणि सुखदा यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. यानंतर एकमेकांचा विचार करायला हरकत नाही अशा शब्दांत अभिजीतनंच सुखदाला प्रपोज केलं. सुखदाने हे अभिजीतचे हे प्रपोज स्वीकारलं आणि 1 फेब्रुवारी 2013 रोजी दोघंही रेशीमगाठीत अडकले. नाशिकमध्ये अभिजीत आणि सुखदाचं शुभमंगल मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.


'हीच तर प्रेमाची गंमत आहे' या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. 'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे.


Web Title: OMG !!! Marathi Actor Abhijit Khandkekar Wife Sukhada Khandkekar Hot Pictures Will Make Your Day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.