OMG! The Bigg Boss Marathi Fame Pushkar Jog is walking with three lions | OMG ! बिग बॉस मराठी फेम हा अभिनेता बिनधास्त चालताना दिसला एक नाही तर चक्क तीन सिंहांसोबत, पहा हा व्हिडिओ
OMG ! बिग बॉस मराठी फेम हा अभिनेता बिनधास्त चालताना दिसला एक नाही तर चक्क तीन सिंहांसोबत, पहा हा व्हिडिओ


अभिनेता पुष्कर जोगबिग बॉस मराठी शोमध्ये झळकला. या शोच्या माध्यमातून पुष्कर घराघरात लोकप्रिय झाला. या शोचा उपविजेता ठरल्यापासून पुष्करला बऱ्याच ऑफर्स येऊ लागल्या आहेत. तो मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ती आणि ती या सिनेमात झळकला. या चित्रपटानंतर तो एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे तो खूप चर्चेत आला आहे.

पुष्कर जोगने इंस्टाग्रामवर २०१६ सालातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो एक नाही तर तब्बल तीन सिंहासोबत चालताना दिसतो आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने म्हटले की, हा दिवस आहे २०१६ सालातील. आमच्या बकेट लिस्टमधील सिंहासोबत चालण्याचे स्वप्न पूर्ण झालं. मी आणि माझी प्रिय पत्नी जास्मीन सिंहासोबत चाललो. ते फक्त दोन वर्षांचे होते आणि आम्ही खूप घाबरलो होतो. साऊथ आफ्रिकेतील व्हॅकेशन खूपच अप्रतिम होते. 

बिग बॉसनंतर पुष्करने एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. या मराठी चित्रपटासह पुष्कर एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे. “एकाच वेळी मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये असलेल्या मोजक्या मराठी कलाकारांपैकी एक आहे” अशी प्रतिक्रिया पुष्करने दिली आहे.

शिवाय या चित्रपटात एक दिग्गज मराठी अभिनेत्री असून याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल असंही पुष्करने सांगितले आहे.


Web Title: OMG! The Bigg Boss Marathi Fame Pushkar Jog is walking with three lions
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.