'नवरी मिळे नवऱ्याला'च्या शूटदरम्यान निवेदिता आणि अशोक सराफ यांची जमली जोडी, अशी आहे हटके लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 07:00 AM2021-06-15T07:00:00+5:302021-06-15T07:00:00+5:30

अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयात १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही.

Nivedita and Ashok Saraf get together during the shoot of 'Navari Mile Navaryala' | 'नवरी मिळे नवऱ्याला'च्या शूटदरम्यान निवेदिता आणि अशोक सराफ यांची जमली जोडी, अशी आहे हटके लव्हस्टोरी

'नवरी मिळे नवऱ्याला'च्या शूटदरम्यान निवेदिता आणि अशोक सराफ यांची जमली जोडी, अशी आहे हटके लव्हस्टोरी

Next

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. या जोडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयात १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही.

अशोक सराफ यांचा 'दोन्ही घरचा पाहुणा' हा पहिला चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा निवेदिता केवळ सहा वर्षांच्या होत्या. अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगावेळी झाली. निवेदिता यांच्या वडिलांनी लेकीची ओळख अशोक यांच्याशी करून दिली होती.


काही कालावधीनंतर निवेदिता यांनीहीदेखील अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हा त्यांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. काम करता करता त्यांच्यात छान मैत्री झाली. नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. या चित्रपटात काम करताना त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे लग्न निवेदिता यांच्या घरतल्यांना मान्य नव्हते. आपल्या मुलीने सिनेइंडस्ट्रीतील व्यक्तीशी लग्न करू नये अशी आईची इच्छा होती. त्यामुळे सुरूवातीला घरातून तीव्र विरोध झाला. मात्र निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यामुळे त्यांच्या हट्टापुढे घरातल्यांना नमते घ्यावे लागले.


अशोक आणि निवेदिता यांचा विवाह गोव्यातील मंगेशीच्या देवळात पार पडला. मंगेशी हे सराफ यांचे कुलदैवत आहे आणि याच मंदिरामध्ये या दोघांनी प्रेमाच्या आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यामुळे याच ठिकाणी लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. लग्न झाल्यानंतर अशोक आणि निवेदिता दोघेही अभिनयाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. 


निवेदिता सराफ यांनी काही काळ वैवाहिक आयुष्यासाठी आणि त्यांच्या मुलासाठी अभिनयाच्या क्षेत्रात ब्रेक घेतला. मुलगा मोठा होईपर्यंत निवेदिता चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या.

मात्र कालांतराने त्यांनी सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले. सध्या त्या अग्गंबाई सूनबाई या मालिकेत आसावरीच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nivedita and Ashok Saraf get together during the shoot of 'Navari Mile Navaryala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app