नेहा महाजनचा ग्लॅमरस लूक एकदा पाहाच, तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 07:15 AM2019-11-02T07:15:00+5:302019-11-02T07:15:00+5:30

नेहाचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

Neha mahajan share her hot photo on instagram | नेहा महाजनचा ग्लॅमरस लूक एकदा पाहाच, तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

नेहा महाजनचा ग्लॅमरस लूक एकदा पाहाच, तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

googlenewsNext

अभिनेत्री नेहा महाजनने  मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे.  मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून ती तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती आणि तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. बोल्ड, हॉट आणि सेक्सी असलेली ही अभिनेत्री तितकीच हुशारही आहे. नेहा ही फिटनेस फ्रिकही आहे. नित्यनियमाने ती योगा करत असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या फिटनेसच्या दिनचर्येकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. 


नेहाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल.


काही दिवसांपूर्वी नेहा बँकॉकमध्ये बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडासोबत शूटिंग करत होती. तिने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना दिली होती. नेहाने एक फोटो शेअर केला होता. या फोटोतून तिने चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, ढाकाच्या सेटवर मला खूप गोष्टी शिकायला मिळत आहे. सेटवर स्वतःची चेअर आहे ज्यावर सिनेमातील पात्राचे नाव असेल. त्या चेअरवर नेसा असं नाव दिसत होते.

Web Title: Neha mahajan share her hot photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.