Video: बडी मुश्कील बाबा..! अमृता- सोनालीचे एक्स्प्रेशन्स पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 02:30 PM2021-10-14T14:30:00+5:302021-10-14T14:30:00+5:30

Amruta khanvilkar: पडद्यावरील या दोन दिग्गज अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एकमेकींच्या बेस्टफ्रेंड असून अनेकदा त्या एकमेकींसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.

navratri 2021ashtami special actress amruta khanvilkar sonali khare dance videos | Video: बडी मुश्कील बाबा..! अमृता- सोनालीचे एक्स्प्रेशन्स पाहून चाहते घायाळ

Video: बडी मुश्कील बाबा..! अमृता- सोनालीचे एक्स्प्रेशन्स पाहून चाहते घायाळ

Next
ठळक मुद्देसध्या नवरात्रीनिमित्त अमृता अमृतकला या डान्स सीरिजअंतर्गत तिचे काही डान्स व्हिडीओ शेअर करत आहे.

कलाविश्वात असे फार मोजके कलाकार आहेत ज्यांच्यात खूप चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. आजही त्यांच्या मैत्रीचं उदाहरण अनेकदा दिलं जातं. तशीच काहीशीही मैत्री अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सोनाली खरे यांच्यात पाहायला मिळते. पडद्यावरील या दोन दिग्गज अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एकमेकींच्या बेस्टफ्रेंड असून अनेकदा त्या एकमेकींसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. अलिकडेच या दोघींनी नवरात्रीनिमित्त एका गाण्यावर ताल धरल्याचं पाहायला मिळालं. याचा एक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

सध्या नवरात्रीनिमित्त अमृता 'अमृतकला' या डान्स सीरिजअंतर्गत तिचे काही डान्स व्हिडीओ शेअर करत आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी तिच्या या सीरिजमध्ये झळकले असून अष्टमीच्या निमित्ताने तिची बेस्ट फ्रेंड या सीरिजमध्ये डान्स करताना दिसून आली. 

अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या दोघींही 'बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा लूक आणि एक्स्प्रेशन्स पाहून चाहते तुफान घायाळ झाले आहेत.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये दोघी अभिनेत्री तुफान एनर्जीने डान्स करताना दिसत आहेत. अमृता आणि सोनाली एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत. अनेकदा त्या दोघी एकमेकींसोबतचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओदेखील पोस्ट करत असतात.
 

Web Title: navratri 2021ashtami special actress amruta khanvilkar sonali khare dance videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app