Natyasamelan date has not postponed due to president's rule in maharashtra says prasad kambli | नाट्यसंमेलन पुढे ढकलले जाणार का, जाणून घ्या काय सांगतायेत प्रसाद कांबळी
नाट्यसंमेलन पुढे ढकलले जाणार का, जाणून घ्या काय सांगतायेत प्रसाद कांबळी

ठळक मुद्देप्रसाद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, ही बातमी खोटी असून मुळात नाट्यसंमेलन कधी करायचे आणि कुठे करायचे याविषयी नाट्यपरिषदेचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर आता नाट्यसंमेलनाची तारीख पुढे ढकलली जाणार असल्याचे काही वृत्तवाहिनींनी दाखवले होते. पण ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.

प्रसाद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, ही बातमी खोटी असून मुळात नाट्यसंमेलन कधी करायचे आणि कुठे करायचे याविषयी नाट्यपरिषदेचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. राष्ट्रपती राजवट ही नुकतीच लागली आहे. पण आमचं काहीच अजून ठरलेले नसल्याने संमेलन राष्ट्रपती राजवटमुळे पुढे जातंय किंवा होत नाहीये असं काहीही नाही. नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद कोण भुषवणार, नाट्यसंमेलानाचे ठिकाण काय असणार आणि ते कधी करायचं असं काहीही ठरलेलं नाहीये. सध्या 100 व्या नाट्यसंमेलनासाठी मोहन जोशी आणि जब्बार पटेल ही दोन नावे पुढे आली आहेत. यामधून कोणाला अध्यक्ष करायचं याचा ही निर्णय अजून नाट्यपरिषदेच्या कार्यकारी मंडळाने घेतलेला नाही. त्यामुळे जे ठरलंच नाही ते पुढे किंवा मागे ढकललं गेलं याचा प्रश्नच येत नाही. 
 

Web Title: Natyasamelan date has not postponed due to president's rule in maharashtra says prasad kambli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.