राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला, ‘संपूर्ण टीमच्या कष्टाचं चीज झालं’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 09:18 AM2018-04-13T09:18:53+5:302018-04-13T14:48:53+5:30

६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम येथून नुकतीच करण्यात आली. संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं या ...

National Award winning director Prasad Oak said, "The whole team's hard work was done" | राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला, ‘संपूर्ण टीमच्या कष्टाचं चीज झालं’

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला, ‘संपूर्ण टीमच्या कष्टाचं चीज झालं’

googlenewsNext
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम येथून नुकतीच करण्यात आली. संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं या मानाच्या पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष लागून राहिले होते. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांच्या विभागासाठीही काही पुरस्कार मिळाले आहेत. ‘कच्चा लिंबू’ या मराठी चित्रपटाला ‘सर्वाेत्कृष्ट मराठी चित्रपट’ पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्त ‘कच्चा लिंबू’चे दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता ते म्हणाले,‘कच्चा लिंबूला पुरस्कार मिळाल्याचं कळताच खरंच खूप छान वाटलं. प्रचंड आनंद होत आहे. हे संपूर्ण टीमचे यश आहे. या चित्रपटामागे सगळयांचेच कष्ट आणि मेहनत सामावलेली आहे. सगळयांच्या कष्टाचं चीज झालं, असं वाटतंय.’  

आधुनिक जगाचा स्पर्शही न झालेला काळ ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाने स्वीकारला आहे आणि काळाच्या पटलावर चार पाऊले मागे जाऊनच त्याची अनुभूती घेणे गरजेचे आहे. जुन्या काळातल्या मुंबईमधल्या गिरगावच्या चाळीत राहणाºयाा अस्सल मध्यमवर्गीय अशा मोहन आणि शैला काटदरे यांच्या आयुष्याची ही गोष्ट आहे. त्यांचा मुलगा बच्चू हा 'स्पेशल चाईल्ड' आहे. शैला एका आॅफिसात काम करते, तर बच्चूजवळ कुणीतरी हवे म्हणून मोहन रात्रपाळीत काम करतो. बच्चू गतिमंद असला, तरी ऐन वयात आलेल्या बच्चूला त्याचे शरीर स्वस्थ बसू देत नाही. बच्चूसाठी स्वत:च्या वैवाहिक जीवनाकडे कळत नकळत दुर्लक्ष झालेल्या शैला आणि मोहन यांनी त्यांच्या सुखाची आहुती दिलेली आहे. नाही म्हणायला शैलाच्या आॅफिसचा बॉस श्रीकांत पंडित यांची सहानुभूती आणि पाठबळ शैलाच्या मागे आहे. या चौघांच्या आयुष्याचा वेध घेत या चित्रपटाने ठोस भाष्य केले आहे. 

Web Title: National Award winning director Prasad Oak said, "The whole team's hard work was done"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.