मराठी चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री दीप्ती देवी नुकतीच 'नाळ' चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट व दीप्तीची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.

सध्या दीप्तीचा सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंतून बोल्ड अंदाज पहायला मिळतो आहे आणि तिच्या या फोटोंची खूप प्रशंसादेखील होत आहे. 

दीप्ती देवीने मराठीसोबतच हिंदी मालिकांतही काम केले आहे. ती राम कपूर व साक्षी तंवर यांची लोकप्रिय हिंदी मालिका 'बडे अच्छे लगते है'मध्ये दिसली होती. याशिवाय तिने परिवार, भाग्यविधाता, डोण्ट वरी चाची या मालिकांमध्येही काम केले. 


'मला सासू हवी' या मालिकेत दीप्तीने मीरा या सुनेची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. 


मला सासू हवी या मालिकेशिवाय दीप्तीने पंखांची सावली, अवघाची हा संसार, चार दिवस सासूचे, साता जन्माच्या गाठी, अंतरपाट या मालिकांमध्येही काम केले.

अभिनयाशिवाय मीरा चांगली डान्सरही आहे. तिने विविध शोजमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे.

दीप्तीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. मंत्र, कडिशन्स अप्लाय- अली लागू आणि पेज ४मध्ये तिने काम केले आहे. 


दीप्तीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर तिने २०१३मध्ये अमोघ देसाईशी साखरपुडा केला आणि २०१६मध्ये ते विवाहबंधनात अडकले.
 

Web Title: 'Naal' Fame Deepti Devi's bold guess on social media, see her photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.