Mayuri Deshmukh's husband Ashutosh Bhakre had given this sign of suicide a month ago? | बापरे..! मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेने महिन्याभरापूर्वीच दिले होते आत्महत्येचे हे संकेत ?

बापरे..! मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेने महिन्याभरापूर्वीच दिले होते आत्महत्येचे हे संकेत ?

अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. वयाच्या 32 व्या वर्षी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असेल, असा सर्वांना प्रश्न पडला आहे. या दरम्यान महिनाभरापूर्वी आशुतोषने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून आत्महत्येसंदर्भात भाष्य करणारा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओतून त्याने आत्महत्येचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.


आशुतोष भाकरे याने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ एका डॉक्टरचा आहे. जगण्याची उमेद एखाद्यामध्ये जास्त असते, आपण एखाद्या व्यक्तीला मदत केल्यास त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवू शकतो याबाबत मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे महिनाभर आधीपासून तो कोणत्या विचारात होता याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.


आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होता.

आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mayuri Deshmukh's husband Ashutosh Bhakre had given this sign of suicide a month ago?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.