'A फक्त तूच' म्हणत चिन्मय पडला सुरुची आडारकरच्या प्रेमात? नेमकं काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:00 AM2021-10-19T09:00:00+5:302021-10-19T09:00:00+5:30

A fakta tuch: दसऱ्याच्या मुहूर्तावर चिन्मयच्या आगामी "A फक्त तूच" या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटामध्ये चिन्मयसोबत अभिनेत्री सुरुची आडारकर स्क्रीन शेअर करणार आहे.

marathi actor chinmay udgirkar suruchi adarkar a fakta tuch marathi movie poster viral | 'A फक्त तूच' म्हणत चिन्मय पडला सुरुची आडारकरच्या प्रेमात? नेमकं काय आहे प्रकरण

'A फक्त तूच' म्हणत चिन्मय पडला सुरुची आडारकरच्या प्रेमात? नेमकं काय आहे प्रकरण

Next
ठळक मुद्देयेत्या नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.

मराठी कलाविश्वातील चिन्मय उदगीरकर (Chinmay udagirkar)  हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन राहिलेलं नाही. ‘स्वप्नांच्या पलीकडले’,’नांदा सौख्य भरे’ आणि ‘घाडगे & सून’ या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला चिन्मय अनेक चित्रपटांमध्ये देखील झळकला आहे. ‘श्यामचे वडील’, ‘वाजलंच पाहिजे’, ‘मेकअप’ या चित्रपटांच्या यशानंतर चिन्मय लवकरच "A फक्त तूच" या आगामी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्क्रिन शेअर करणार आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर चिन्मयच्या आगामी "A फक्त तूच" या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटामध्ये चिन्मयसोबत अभिनेत्री सुरुची आडारकर (Suruchi Adarkar) स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये समुद्राची उसळलेली लाट, एकमेकांच्या हातावर हात ठेऊन बसलेले दोन प्रेमयुगुल आणि त्यावर गुलाबाचं फूल असं चित्र या पोस्टमध्ये दिसत आहे. सोबतच  'कारण आपलं नातं वेगळं आहे...'अशी टॅगलाइन या पोस्टवर दिसून येत आहे. त्यामुळे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पहायला मिळत आहे. 

दरम्यान, येत्या नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. रंगनाथ बबन पाचंगे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती जयदीप फिल्म प्रोडक्शनअंतर्गत करण्यात आली आहे. सोबतच निर्मितीची धुरादेखील रंगनाथ यांनी सांभाळली आहे. सुरुची आणि चिन्मय व्यतिरिक्त या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वाम्बुरकर, गीत निखारगे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
 

Web Title: marathi actor chinmay udgirkar suruchi adarkar a fakta tuch marathi movie poster viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app