मराठी बिग बॉसमधून अभिनेता आस्ताद काळे याची लव्हस्टोरी जगासमोर आली. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉस मराठीमध्ये दिली होती. आस्तादच नाही तर स्वप्नालीनेही हे मान्य केले आहे. आस्ताद आणि स्वप्नालीने पुढचे पाऊल या मालिकेत त्याच्यासोबत काम केले होते. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात असल्याचे म्हटले जात होते. अखेर मराठी बिग बॉसमध्ये आस्तादने आपल्या प्रेमाची कबुली दिली. नुकतंच आस्तादने शेअर केलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


या फोटोत आस्ताद आणि स्वप्नाली रोमँटिक पोझमध्ये पाहायला मिळत आहे. आस्तादने या फोटोत काळ्या रंगाचा सूट तर स्वप्नालीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा रोमँटिक फोटो म्हणजे प्री वेडिंग शूट असल्याचं दिसतंय. त्यामुळे आस्तादने फोटो पोस्ट करताच फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेकांनी प्री वेडिंग शूटचं कौतुक करत या रोमँटिक कपलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


अनेक वर्षांपूर्वी एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला.

आस्तादने स्वप्नालीला प्रपोज केले नाही. मात्र मनात काय हे बोललेच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे स्वप्नालीला त्याने तू मला आवडतेस असे सांगितले. त्यावर या गोष्टीचा विचार करू दे असे उत्तर स्वप्नालीने त्याला दिलं आणि जवळजवळ वर्षभरानंतर होकार कळवला होता. आता या प्री वेडिंग फोटो शूटमुळे दोघांच्या लग्नाची घटीका समीप आलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 


Web Title: Marathi Actor Aastad Kale & Swapnali Patil very soon tie knot, romantic photo on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.