सासरी चुलीवर चपात्या बनवताना दिसली मानसी नाईक, व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 06:19 PM2021-11-25T18:19:21+5:302021-11-25T18:20:15+5:30

मानसी नाईकच्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Mansi Naik seen making chapatis on father-in-law's stove, a shower of appreciation on video | सासरी चुलीवर चपात्या बनवताना दिसली मानसी नाईक, व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

सासरी चुलीवर चपात्या बनवताना दिसली मानसी नाईक, व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

googlenewsNext

बघतोय रिक्षावाल्या या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणारी अभिनेत्री मानसी नाईक हिने आपल्या डान्स कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मानसी सध्या सासरी फरीदाबादला असून तिथले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान तिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती चुलीवर चपात्या बनवताना दिसते आहे.

मानसी नाईकने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, भूख का रिश्ता सिर्फ़ रोटी से है, चमकती थालियाँ भूख नहीं मिटाती.
तिने पुढे लिहिले की, जेव्हा मी माझ्या सासरी चुलीवरच्या चपात्या बनवायला शिकले.  तिच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिले की, खूपच छान तुम्हाला कशाचा गर्व अभिमान नाही. तुम्हाला चुलीवरच्या चपात्या बनवताना खूप आश्चर्य वाटत आहे आणि आज कालच्या मुलींना तर ते पण करता नाही येत खूप अभिमान आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, खूप छान मानसी ताई.... खूप छान दिसतेस या लूकमध्ये. आवडती मराठी अभिनेत्री आहेस तू. लव्ह यू दी. आणखी एका युजरने लिहिले की, एक नंबर किती गोड.
मानसी नाईक तिच्या सासरी फरीदाबादला दीराच्या लग्नासाठी गेली होती. तिथले फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Web Title: Mansi Naik seen making chapatis on father-in-law's stove, a shower of appreciation on video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.