तर बाथरूममध्येही फोटोशूट करते ही अभिनेत्री, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 06:00 AM2020-02-11T06:00:00+5:302020-02-11T06:00:00+5:30

मानसीने काही दिवसांपूर्वीच एक गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. वाढदिवसादिवशीच तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितलं होते.

Manasi Naik Bathroom PhotoViral On Social Media | तर बाथरूममध्येही फोटोशूट करते ही अभिनेत्री, हा घ्या पुरावा

तर बाथरूममध्येही फोटोशूट करते ही अभिनेत्री, हा घ्या पुरावा

googlenewsNext

सिने इंडस्ट्रीत सगळ्याच अभिनेत्री आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितक्याच सजग झाल्या आहेत.  कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाण असणारी मानसी नाईक  नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. 


याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. पण हा फोटो शेअर करताना मानसीने मात्र एडिट करण्याचीही तसदी घेतलेली दिसत नाही. बॉथरूमध्ये फोटो क्लिक करताना अनेक अभिनेत्री पाहायला मिळतात. त्यामुळे मानसी नाइकनेही असे केले तर कुठे बिघडले असेही तुम्हाला वाटेल. पण हा फोटो एडिट न करताच शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर अनेक जोक्स आणि मिम्सही व्हायरल होत आहे. मानसीच्या आजुबाजुला वॉश बेसिन दिसत असून ती मध्ये बसल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरितच हौस तिथे मौज हीच ओळ हा फोटो पाहून तुम्हाला आठवेल हे मात्र नक्की.


मानसीने काही दिवसांपूर्वीच एक गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. वाढदिवसादिवशीच तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितलं होते. तिने प्रेमात असल्याचे सांगून तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला. मानसी नाईक हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या दोघांचा फोटो शेअर करत लिहिले की, यावर्षी मी स्वतःला गिफ्ट द्यायचे ठरवले तेही प्रेम व कमिटमेंटसोबत. ओळखा काय असेल ते. मेहनती, प्रेमळ व विश्वासू आणि कमिटेड व्यक्ती. हो मी प्रेमात पडली आहे. प्रदीप खरेरा तुझे माझ्या जगात स्वागत आहे.

Web Title: Manasi Naik Bathroom PhotoViral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.