mahesh tilekar slammed actress ketaki chitale for posting controversial comments on Chhatrapati Shivaji Maharaj | केतकी चितळे समाजात द्वेष पसरवण्याचा करतेय प्रयत्न,महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यावरून महेश टिळेकरांनी तिला सुनावले खडेबोल

केतकी चितळे समाजात द्वेष पसरवण्याचा करतेय प्रयत्न,महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यावरून महेश टिळेकरांनी तिला सुनावले खडेबोल

सर्वाचे आदरस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणे केतकी चितळेला चांगले महागात पडणार असल्याचे दिसतंय. काही वेळापूर्वी केतकीने ही वादग्रस्त पोस्ट करत शिवप्रेंमींच्या भावना दुखावल्या आहेत. अखंड भारताचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा करताना तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे देशातील समस्त शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्थरावरून तिच्यावर सडकून टिका होत आहे. https://www.lokmat.com/marathi-cinema/netizens-slammed-ketki-chitale-supporting-stand-comedian-agrima-joshua-comments-shivaji-maharaj-a591/

ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक म्हण त्यांना बातमीतमहेश टिळेकर यांनीही संतप्त होत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत तरुण पिढीबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मराठी अभिनेत्रीला माझ्याकडून हा ’घरचा आहेर’👍 केतकी बाईला एकच प्रश्न विचारायचा आहे जेव्हा महाराष्ट्रावर मोठे संकट येते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनून तरूण मंडळीच मदतीसाठी पुढे येतात.

तेव्हा बरं केतकीने त्यांचे कधी कौतुक केले नाही. स्वतःने अशी कोणती कामगिरी केली आहे. घरात टीव्ही बघून, झोपा काढून वेळ घालवणारी केतकीला काय अधिकार आहे तरूण मंडळींना बोलण्याचा.अशा प्रकारे शाब्दिक टीका करत तिची शाळाच घेतली आहे. 

फेसबुक पोस्ट करत काय लिहीले केतकीने !

केतकी चितळेने जोशुआची अक्कल ठीकाण्यावर आणण्याऱ्या मावळ्यांचीच अक्कल काढली आहे. ‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा’ ! अशी संतापजनक फेसबुक पोस्ट केतकी चितळेने केली आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mahesh tilekar slammed actress ketaki chitale for posting controversial comments on Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.