Netizens slammed Ketki chitale on supporting stand-up comedian agrima Joshua on comments on shivaji maharaj | "तुझी लायकी तरी आहे का", केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर शिवप्रेमी भडकले.....

"तुझी लायकी तरी आहे का", केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर शिवप्रेमी भडकले.....

मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या काही दिवसांपासून केतकी  वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळे तिच्यावर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. पुन्हा एकदा केतकीने सोशल मीडियावर तिचे विचार मांडले आहेत. यावेळी  तिने  थेट छत्रपती शिवाजी महाराजांबाबत पोस्ट केली आहे. 

त्यात तिने म्हटले आहे की, ''३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!'' 

1 मार्चलाही केतकीने अशाचप्रकारे  फेसबुक पोस्ट लिहीत भावना दुखावण्याचा प्रयत्न केला होता. या पोस्टमध्ये केतकीने बौद्ध समाजावर टीका केली होती.  केतकीने केलेल्या पोस्टवर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनाला येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क असल्याचं केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं होते. केतकीच्या याच वक्तव्यावरुन आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात केतकीविरोधात तक्रार दाखल केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Netizens slammed Ketki chitale on supporting stand-up comedian agrima Joshua on comments on shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.