लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमेय वाघने लढवली ही शक्कल, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 12:30 PM2020-04-27T12:30:21+5:302020-04-27T12:31:09+5:30

लॉकडाउनमुळे सध्या घरात कैद असलेल्या अमेयने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे.

In the lockdown, Ameya Wagh fought to entertain the audience, read more | लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमेय वाघने लढवली ही शक्कल, वाचा सविस्तर

लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमेय वाघने लढवली ही शक्कल, वाचा सविस्तर

googlenewsNext

मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. आपल्या अभिनयाने अमेयने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. लॉकडाउनमुळे सध्या घरात कैद असलेल्या अमेयने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. त्याने स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. वाघचा स्वॅग असं या चॅनेलचं नाव आहे. ही माहिती अमेयने फेसकबुकवर दिली आहे.

अमेय वाघने फेसबुकवर युट्युब चॅनेलची लिंक पाठवत लिहिले की, कलाकार म्हणून जी energy आहे ती channelise करता यावी म्हणून हे “YouTube Channel “ काढलय! पटकन subscribe मारा! हळू हळू माल upload होतोय ! #waghchaswag #youtubechannel

दिल दोस्ती दुनियादारी ही त्याची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते.

काही महिन्यांपूर्वी अमेय अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत गर्लफ्रेंड सिनेमात दिसला होता.

तसेच नुकतीच त्याची आसुर ही हिंदी वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली आहे.

Web Title: In the lockdown, Ameya Wagh fought to entertain the audience, read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.