अदिती पोहनकरने रितेश देशमुखसह 'लयभारी' या सिनेमात झळकली होती.अदितीने या सिनेमात साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते. आता तिला एका वेगळ्या भूमिकेत झळकायची इच्छा आहे. मराठी सिनेमाच्या कथेतील ताकद  संपूर्ण जगाने पाहिलीय. मराठी सिनेमा नेहमीच माझं पहिलं प्रेम राहिले आहे. मात्र, भूमिकाही तशा मिळायल्या हव्यात. 'सैराट २' सिनेमात काम करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.  हिंदी, मराठी, तमिळ सिनेमांमध्ये आदितीने झळकलेली अभिनेत्री अदिती पोहनकरने मोजक्याच पण लक्षात राहतील अशाच भूमिका साकारल्या आहेत.

सुरुवातीपासूनच निवडक काम करण्याला प्राधान्य दिलं आहे. 'लय भारी'  सिनेमातून ख-या अर्थाने ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर ‘ट्रकभर स्वप्नं’ या मराठी सिनेमातही ती वेगळ्याच अंदाजात रसिकांच्या भेटीला आली होती. आदितीला साचेबद्ध पठडीत अडकून राहून काम करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे नेहमी काही तरही हटके आणि वेगळ्या कामाच्या शोधात ती असते. त्यामुळेच की काय आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चौकटीबाहेरच्या भूमिकांना तितक्याच ताकदीने न्याय देणारी अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली आहे. 


आजपर्यंत तिने निशिकांत कामत, इम्तियाज अली, प्रकाश झा अशा  नावाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळाला असून यापुढेही अशाच दिग्दर्शकांसह काम करायाला मिळायला हवे असेही तिने सांगितले. 'शी' या वेबसिरीजमध्येही आदितीच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले आता 'आश्रम' या सीरिजमध्ये ती झळकत असून या भूमिकेलाही रसिकांची विशेष पसंती मिळत आहे.  

आदिती स्पोर्ट्स आणि संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आहे. तिची आई शोभा पोहनकर या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पिअन आहेत. तर काका पंडीत अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: LayBhari Movie Actress Aditi Pohankar want to work in Sairat 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.