Kranti Redkar launch Clothing Brand ZZ ZIYA ZYDA | अभिनेत्री क्रांती रेडकरची नवी इनिंग, अभिनयाव्यतिरिक्त करणार 'हे' काम

अभिनेत्री क्रांती रेडकरची नवी इनिंग, अभिनयाव्यतिरिक्त करणार 'हे' काम

कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. 'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे'  यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री क्रांती रेडकर अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनही काम केले. लग्नानंतर ती संसारात रमली आता अभिनयासोबत क्रांतीने नवी इनिंग सुरू  केली आहे. तिने स्वतःचे फॅशन ब्रँड  लॉन्च केले आहे.  ‘ZZ झिया झायदा’ असे या क्लोथिंग ब्रँडचे नाव आहे.

आपल्या नव्या इनिंगबाबत ती बरीच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ZZ झिया झायदा’ या नवीन क्लोथिंग ब्रँडच्या नावातच आकर्षण तर आहेच आणि या माध्यमातून क्रांतीची फॅशन स्टाईल आणि युनिक कलेक्शन पाहायला मिळणार याची उत्सुकता देखील आहे. क्रांतीच्या या नव्या उपक्रमाला तिचे फॅन्स आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.  एकुणच काय बॉलिवूडप्रमाणे अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड आता मराठी कलाकरांमध्येही रुढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


 

क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना सांभाळते ही व्यक्ती, क्रांतीने मानले आभार

क्रांती रेडकरने ३ डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला. या मुलींना सांभाळण्यासाठी क्रांतीने केअर टेकर ठेवली आहे. जिचे आभार नुकतेच क्रांतीने सोशल मीडियावर फोटो शेअर करून मानले आहे. क्रांतीने पुढे लिहिले की, मला दोन मुले आहेत. त्यामुळे आणखीन एक केअर टेकर आहे. जिचा यात फोटो नाही.तिचाही फोटो लवकरच शेअर करेन. माझे या मुलींवर प्रेम आहे. पैसे मदत विकत घेऊ शकतात पण प्रेम नाही. या दोघी माझ्या मुलींची खूप प्रेमाने काळजी घेतात.

तर 'या' अभिनेत्री बनल्या बिझनेसवुमन

मराठी इंडस्ट्रीत अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वतःचे क्लोथिंग ब्रँड लॉन्च केले होते. 'तेजाज्ञा' असे या क्लोथिंग ब्रँडचे नाव आहे. याचपाठोपाठ अभिनेत्री प्रिया मराठे हिने मुंबईतील मिरा रोड या ठिकाणी स्वतःचं कॅफे सुरु केले आहे. 'द बॉम्बे फ्राईज' असं या कॅफेचे नाव आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kranti Redkar launch Clothing Brand ZZ ZIYA ZYDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.