चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सचिन पिळगावकर. मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनयासह दिग्दर्शन, निर्मिती, गायन, नृत्य यातही सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर यांनी गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. सचिन यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. आता या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेक श्रिया पिळगावकरसुद्धा अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 


बाप लेकीचं नातं घट्ट आणि तितकंच प्रेमळ असतं हे साऱ्यांनाच माहिती आहे. सचिन आणि श्रिया यांचंही नातं आणि प्रेम याला अपवाद नाही. त्यामुळंच की सचिन यांच्यासोबतच श्रियानं 'एकुलती एक' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. मात्र श्रियाचं आपल्या आईवरही तितकंच प्रेम आहे. आपल्या जीवनात आईचं काय महत्त्त्व आहे आणि तिच्यावर आपलं किती प्रेम आहे हे श्रियाने सोशल मीडियावर सांगितलं आहे. 

श्रियाने आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला असून यांत तिच्या आई सुप्रिया यांनी तिचा हात पकडला आहे. या फोटोसह श्रियाने आपल्या मनातल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. आई आपल्यासाठी सारं काही आणि जन्मोजन्मी तूच माझी आई असावी अशा भावना श्रियाने व्यक्त केल्या आहेत. आईवर खूप खूप प्रेम असव्याचंही तिने यांत म्हटलं आहे.

तुझ्या चेहऱ्यावरील हास्य कायम राहावं अशी भावनाही तिने यांत व्यक्त केली आहे. या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. एकुलती एक चित्रपटानंतर श्रिया किंग खान शाहरुखच्या फॅन या सिनेमातही झळकली. शिवाय फ्रेंच सिनेमातही तिने काम केले आहे. आता श्रिया एका ब्रिटीश टीव्ही सिरीजमध्ये झळकणार आहे. 

Web Title: Know The Actresses In This Pic,one Is Mother & Other One Is Her Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.