नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांना भुरळ पाडणारा अभिनेता सुनील बर्वे आजही लोकप्रिय आहे. सुनील बर्वेची प्रेमकथा तुम्हाला माहित आहे का? एकेकाळी सुनील बर्वेला एका मुलीने नाकारलं होतं. आज तीच मुलगी सुनीलची पत्नी आहे. तिचं नाव अपर्णा बर्वे आहे. 


सुनील बर्वेने मुंबईतील गोरेगाव येथील पाटकल कॉलेजमधून बीएससीची पदवी घेतली. अपर्णा बर्वे अकरावी इयत्तेत असताना सुनील बारावी इयत्तेत होता. सुनील महाविद्यालयात त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आणि टंगळबाज मुलांमध्ये रहायला लागला होता. सुनीलनं कॉलेज पूर्ण केलं. तसंच काही दिवस मेडिकल रिप्रेजेंटेटीव्हची नोकरीही केली. पण नोकरीत मन न रमल्यामुळे सुनीलने अभिनय करण्याचा निर्णय घेतला. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाटकर महाविद्यालयाबाहेर विश्वास नामक हॉटेल आहे. तिथे एकेदिवशी अपर्णा तिच्या मैत्रिणीचा बर्थडे साजरा करत होती. तिथे पाटकर कॉलेजबाहेर एक विश्वास हॉटेल आहे. तिथे अपर्णा तिच्या एका मैत्रिणीचा बर्थडे सेलिब्रेट करत होती. तिथे सुनीलने प्रथम अपर्णाला पाहिले आणि तो प्रेमात पडला.

अपर्णाने तिच्या हातात तिच्या नावाचं एक ब्रेसलेट घातलं होतं, त्यावरुन सुनीलला तिचे नाव अपर्णा असल्याचं समजलं. सुनीलने कसाबसा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा अपर्णाने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. कशीबशी ओळख वाढवत सुनीलने अपर्णासोबत मैत्री केली आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर अखेर प्रेमात झालं.

अपर्णा आणि सुनील यांना सानिका आणि अथर्व ही दोन मुलं आहेत.

सुनील बर्वे सोशल मीडियावर सक्रीय असून त्याचे पत्नी व मुलासोबतचे फोटो पहायला मिळतात.


Web Title: Have you seen the pictures of Sunil Barve's wife?, Sunil felt in love at first sight
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.