'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स', पाहा चित्रपटाचा भन्नाट टिझर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:59 PM2019-10-17T12:59:04+5:302019-10-17T13:02:06+5:30

सर्व बंधने झुगारून स्वछंदी जगण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. 'हम भी किसीसे कम नही' अशाच काहीशा अंदाजात त्या आपल्याला चित्रपटात दिसणार आहेत.

Girlz Marathi Movie Teaser | 'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स', पाहा चित्रपटाचा भन्नाट टिझर

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स', पाहा चित्रपटाचा भन्नाट टिझर

googlenewsNext

तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज येण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आला आहे 'गर्ल्स' चित्रपटाचा भन्नाट टिझर. या टीझरमध्ये 'बॉईज' या अफलातून 'गर्ल्स'ची ओळख करून देताना दिसत आहेत. मुली काहीच करू शकत नाहीत, असे सांगणाऱ्या या 'बॉईज'ना या 'गर्ल्स' अतिशय चपखल उत्तर देत आहेत. मनमुराद जगणे, राडा घालणे, धमाल-मस्ती करणे एकंदरच लाईफ एन्जॉय करताना त्या दिसत आहेत. सर्व बंधने झुगारून स्वछंदी जगण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. 'हम भी किसीसे कम नही' अशाच काहीशा अंदाजात त्या आपल्याला चित्रपटात दिसणार आहेत.


 मुलींची धमाल, त्यांचे गॉसिपिंगचे विषय,त्यांची जगण्याची संकल्पना अशा मुलींशी संबंधित बऱ्याच गोष्टी या अनेकदा त्यांच्यापुरताच मर्यादित असतात. त्याची कल्पना इतरांना नसते. त्यामुळे मुली लाईफ एन्जॉय करतच नाहीत, असा अनेकांचा समज असतो. हाच गैरसमज दूर करण्यासाठी दिग्दर्शक विशाल देवरुखकर घेऊन येत आहेत 'गर्ल्स'. एकूणच काय मुलींच्या बंदिस्त विश्वात नक्की काय घडते? या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटातून सर्वांना मिळणार आहे. मात्र यासाठी  २९ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.

 


 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट', 'कायरा कुमार क्रिएशन्स' प्रस्तुत आणि 'अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन'च्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.
   
 

Web Title: Girlz Marathi Movie Teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.