Girija Oak Godbole looks drop-dead gorgeous in her Ethnic wear | पिवळ्या साडीत गिरीजा ओकचे असे खुललं सौंदर्य, फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात
पिवळ्या साडीत गिरीजा ओकचे असे खुललं सौंदर्य, फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

मालिका, सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले. नेहमीच तिचे चाहते तिच्या अभिनयाच्या प्रेमात तर पडतातच मात्र आता तिच्या सोज्वळ सौदर्यांच्या प्रेमातही पडले आहेत. नुकतेच तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेला फोटो रसिकांना भावतो आहे. या साडीत गिरीजाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.  यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे. या फोटोवर गिरीजाचे फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 

ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची गिरीजा मुलगी असून वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून गिरीजा अभिनय क्षेत्रात आली.  जाहिराती, मालिका, सिनेमा, नाटक यानंतर गिरीजा शॉर्टफिल्मच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आली होती. सोशल मीडियाच्या युगात तर कलाकारांपुढची आव्हानं आणखी वाढली आहेत. त्यामुळेच कोणत्याही माध्यमात भूमिका साकारत आव्हान पेलण्याची कलाकारांची तयारी असते. असंच आव्हान गिरीजाने पेलले होते. ‘क्वॉर्टर’ या शॉर्टफिल्ममध्ये ती झळकली होती. यांत गिरीजाचा वेगळा लूक रसिकांना पाहायला मिळाला. आजवर विविध माध्यमांतून वेगवगेळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यास मिळाल्या असल्या तरी ‘क्वॉर्टर’मधली भूमिका अभिनेत्री म्हणून समाधान देणारी असल्याचेही गिरीजाला सांगितले होते. 


Web Title: Girija Oak Godbole looks drop-dead gorgeous in her Ethnic wear
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.