मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली होती. हे कारण म्हणजे WOW. 

सोनाली खरे हिने सोशल मीडियावर WOW या लोगोसोबत फोटो शेअर करत तिने वॉव काय आहे? ओळखा पाहू ? असं कॅप्शन दिलं होतं.

सोनालीचे WOW हे काय आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत होता.

कुणाला वाटतं होतं की ती रेसिपी सांगणार आहे तर कुणाला वाटतं होतं की कोणत्या प्रोडक्टचं ब्रॅण्डिंग करणार आहे. तर कुणी म्हणतं होतं आठवड्याला वर्कआऊट करून दाखवणार आहे. चित्रपटसृष्टीतील तिचे मित्रमंडळी त्यांची वॉव मोमेंट सांगत सोशल मी़डियावर तिला शुभेच्छा देताना दिसत होते.


अखेर सोनालीच्या या WOWचं गुपित समोर आलं आहे. WOW नावाचं युट्यूब चॅनेल सोनाली सुरू करत आहे. हे चॅनेल हेल्थ, वेलनेस व फिटनेसशी निगडीत असेल. या चॅनेलच्या माध्यमातून सोनाली तिचे अनुभव शेअर करणार आहे. या अंतर्गत एक्सरसाईज, डाएट याच्याशी संबंधीत गोष्टी आणि इंटरव्ह्यू वगैरे आपल्याला पहायला मिळणार आहेत.


खरेतर सोनालीने इंस्टाग्रामवरील IGTV च्या माध्यमातून फिटनेसबाबतचे काही व्हिडिओज केले होते आणि या व्हिडिओंना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

त्यानंतर सोनालीने युट्युब चॅनेल सुरू करायचे ठरविले. याबाबत सोनाली म्हणाली की, युट्यूब हे खूप चांगले माध्यम आहे. मी देखील हे माध्यम एक्सप्लोअर करत आहे. तर WOWचा फुलफॉर्म आहे वर्ल्ड ऑफ वेलनेस आणि याच नावाने मी युट्यूब चॅनेल सुरू करते आहे. मला आशा आहे की माझ्या WOW विथ सोनाली या चॅनेलला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल


WOW या चॅनेलवर सोनालीचा पहिला एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोनाली शेवटची हृद्यांतर चित्रपटात झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ती बाहुबली चित्रपटावर आधारीत वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

या सीरिजमध्ये काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. यात ती पारंपारिक वेशात दिसणार आहे. 


Web Title: Finally find out about the secret of Sonali Khare's 'WOW'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.