रिंकू राजगुरूच्या स्माईलवर फिदा झाले चाहते, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 02:27 PM2021-06-12T14:27:16+5:302021-06-12T14:28:16+5:30

रिंकू राजगुरूने इंस्टाग्राम स्टोरीवर तिचे फोटो शेअर केले आहे. या फोटोतील तिच्या स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत.

Fans fell in love with Rinku Rajguru's smile, the photo went viral | रिंकू राजगुरूच्या स्माईलवर फिदा झाले चाहते, फोटो झाला व्हायरल

रिंकू राजगुरूच्या स्माईलवर फिदा झाले चाहते, फोटो झाला व्हायरल

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे. रिंकू राजगुरू सध्या अकलूजमध्ये आहे. त्यामुळे ती कुटुंबासोबत क्वॉलिटी टाइम व्यतित करत आहे. अवांतर वाचन करणे आणि फिटनेसकडे ती सध्या लक्ष देताना दिसते आहे. रिंकू बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


रिंकू राजगुरूने इंस्टाग्राम स्टोरीवर तिचे फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती स्माइल करताना दिसते आहे. तिचा हा फोटो व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोतील तिच्या स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत.


रिंकू राजगुरू सैराटनंतर खूपच बदलली आहे. दिवसेंदिवस ती ग्लॅमरस होत चालली आहे. त्यासाठी ती खूप मेहनतही घेते. ती दररोज न चुकता वर्कआउट करते.  नुकतेच तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,यापूर्वी मी कधीच फिटनेसला इतके महत्त्व दिले नव्हते. त्यावेळी आपली फिगर मेन्टेन असावी, आपण छान दिसावे असे वाटायचे नाही. पण जेव्हा जाणवले आपले वजन आवाक्याबाहेर चालले आहे. त्यामुळे फिटनेसकडे लक्ष दिले.


रिंकू राजगुरूच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती मराठी चित्रपट छूमंतर आणि हिंदी चित्रपट झुंड आणि हिंदी वेबसीरिज जस्टिस डिलिव्हर्डमध्ये झळकणार आहे.

छूमंतर चित्रपटात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर झुंड या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे आणि यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. तर जस्टिस डिलिवर्ड या वेबसीरिजचे शूटिंग नुकतेच तिने पूर्ण केले आहे. यात ती अमोल पालेकर यांच्यासोबत पहायला मिळणार आहे. 

Web Title: Fans fell in love with Rinku Rajguru's smile, the photo went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.