'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून अ‍ॅना म्हणजेच पूजा ठोंबरे हिच्या अभिनयाचे कौतुक सगळीकडेच झाले होते. या मालिकेत उलटसुलट प्रश्न विचारून इतर कलाकारांना गोंधळात टाकणारी अ‍ॅना ही तरूणाचींच नाही तर लहान मुलांची देखील फेव्हरेट झाली होती. त्यानंतर ती अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून रसिकांच्या भेटीला आली होती. मालिकेनंतर फारशी छोट्या पडद्यावर न दिसलेल्या अ‍ॅना उर्फ पूजा ठोंबरेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. ही माहिती खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर दिली आहे.

पूजा ठोंबरे हिचा १४ डिसेंबरला नाशिक येथील नामपूर येथे कुणाल अहिररावसोबत साखरपुडा पार पडला. पूजा व कुणाल यांचे साखरपुड्यातील कपडे अभिनेत्री आरती वबडगावकर हिने डिझाईन केलेले होते. ही माहिती त्या दोघांनी इंस्टाग्रामवर दिली आहे.

 हा सोहळा कौटुंबिक पद्धतीने पार पडला. यावेळी आरती खुपच सुंदर दिसत होती. त्या दोघांच्या फोटोवर इंस्टाग्रामवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळतो आहे. आता हे दोघं लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

पूजा मुळची औरंगाबाद येथील बीड जिल्ह्यातील आहे. येथील केएसके महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी पूजा ठोंबरे हिने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच आपली मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे.

तिने शालेय जीवनापासून ते आतापर्यंत अगणित पुरस्कार पटकावले आहेत. ई टीव्ही, झी मराठी तसेच विविध दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून अभिनय व नृत्याचे कसब पणाला लावत मराठी रंगभूमीवर अभिनयाची छाप पाडत तिने मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे.


'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने पूजाला घराघरात ओळख मिळवून दिली आहे.

या मालिकेनंतर ती सुबक निर्मित ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात झळकली होती. 

Web Title: Dil Dosti Duniyadari Fame Actress got engaged, see her photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.