Corona Lock Down: दिल दोस्ती दुनियादारी मधील ही अभिनेत्री अडकली लंडनमध्ये, चाहते देतायेत सुरक्षित राहण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 03:50 PM2020-03-30T15:50:05+5:302020-03-30T15:52:46+5:30

अनेक कलाकार लॉक डाउनमुळे घरात राहून घरातली कामं आणि छंद जोपासून वेल घालवत आहेत. अनेक कलाकारांची मुलं सध्या उच्चशिक्षणासाठी परदेशात स्थायिक झाले आहेत. काही परतले तर काही तिकडेच अडकले आहेत.

Dil Dosti Duniyadari Actress Sakhi Gokhle Stuck in London due to corona lockdown worldwide-SRJ | Corona Lock Down: दिल दोस्ती दुनियादारी मधील ही अभिनेत्री अडकली लंडनमध्ये, चाहते देतायेत सुरक्षित राहण्याचा सल्ला

Corona Lock Down: दिल दोस्ती दुनियादारी मधील ही अभिनेत्री अडकली लंडनमध्ये, चाहते देतायेत सुरक्षित राहण्याचा सल्ला

googlenewsNext

जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रविवारी सकाळी 6 लाख 63 हजार 541 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. तर 30, 873 लोकांचा मृत्यू झाला आहे. यादमरम्यान 1 लाख 42 हजार 175 रुग्ण ठीक झाले आहेत. युरोपात मृतांचा आकडा 20 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. अशांमध्ये सर्वत्रच पूर्णपणे लॉक डाउन करण्यात आले आहे. अनेक कलाकार लॉक डाउनमुळे घरात राहून घरातली कामं आणि छंद जोपासून वेल घालवत आहेत. अनेक कलाकारांची मुलं सध्या उच्चशिक्षणासाठी परदेशात स्थायिक झाले आहेत. काही परतले तर काही तिकडेच अडकले आहेत. 

दिवंगत अभिनेता मोहन गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या असलेल्या सखीने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिल, दोस्ती, दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सखीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सखी अमर फोटो स्टुडिओ या नाटकातही तीन  काम  केले आहे.  याशिवाय दिल दोस्ती दोबारा, रंग्रेज, तुकाराम या सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. तसेच गेल्याचवर्षी सखीने अभिनेता सुव्रत जोशीसह लग्न करत आपल्या आयुष्याला नवीन सुरूवात केली आहे. मात्र उच्च शिक्षणासाठी अभिनेत्री सखी गोखले लंडनला असते आणि तिचा पती सुव्रतहा भारतात असतो.

 त्यामुळे अनेकदा सुव्रत पत्नीला भेटायला लंडनला येऊन जाऊन असतो. या दोघांचे क्युट रोमांटीक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची तुफान पसंती मिळवत असतात. तसेच दोघेही एकमेकांपासून लांब राहत असल्यामुळे तू ती मी इथे अशी अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. आता तर सखी लंडनमध्येच अडकली आहे. लॉक डाउन असल्यामुळे एका बंदिस्त खोलित तिनेही स्वतःला बंद करून घेतले आहे. यांत ती सोशल मीडियावर तिच्या खासजी घडामोडी चाहत्यांसह शेअर करत असते. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहता चाहतेही सखीला सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत. 


२०१५ साली दुनियादारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेच्या सेटवरच सुव्रत व सखीची ओळख झाली. या मालिकेत काम करत असतानाच सुव्रत व सखी यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलू लागल्याचे बोलले जात होते. मात्र काही दिवसांनंतर ते दोघे सगळीकडे एकत्र दिसू लागले. मात्र त्यांनी कधीच त्यांचे नाते जगासमोर स्विकारले नव्हते. एक चांगले मित्र असल्याचेच नेहमी सांगायचे. मात्र त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो पाहून मैत्रिपलिकडेही त्यांच्या प्रेमाचा अंकुर फुलत असल्याचे सा-यांनाच समजले होते. अखेर सखी आणि सुव्रत यांचा ११ एप्रिलला त्या दोघांचा पुण्यात मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. आता लवकरच त्यांचे लग्नाची अॅनिव्हर्सरी ते सेलिब्रेट करणार आहेत.

Web Title: Dil Dosti Duniyadari Actress Sakhi Gokhle Stuck in London due to corona lockdown worldwide-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.