अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या बहिणीला पाहिलंत का?, हुबेहूब दिसते तिच्यासारखी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:00 AM2021-08-25T07:00:00+5:302021-08-25T07:00:00+5:30

फार कमी लोकांना माहित आहे की, तेजस्विनी पंडितला सख्खी बहिण आहे आणि ती अगदी हुबेहूब तिच्यासारखीच दिसते.

Did you see actress Tejaswini Pandit's sister? She looks exactly like her | अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या बहिणीला पाहिलंत का?, हुबेहूब दिसते तिच्यासारखी

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या बहिणीला पाहिलंत का?, हुबेहूब दिसते तिच्यासारखी

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तेजस्विनी बऱ्याचदा ट्रोल होते. परंतु ती वेळोवेळी ट्रोलर्सना रोखठोक उत्तर देत असते. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीतने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, तेजस्विनी पंडितला सख्खी बहिण आहे आणि ती अगदी हुबेहूब तिच्यासारखीच दिसते. 

तेजस्विनी पंडितची आई ज्योती चांदेकर मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनीने देखील सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

तेजस्विनी पंडितची सख्खी बहिण अगदी तिच्यासारखी दिसते. तिचे नाव पूर्णिमा आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी पंडितने पूर्णिमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

तसेच रक्षाबंधनाच्या दिवशीदेखील बहिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
तेजस्विनी पंडितने मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

शेवटची तेजस्विनी पंडित समांतर २ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत होते. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

Web Title: Did you see actress Tejaswini Pandit's sister? She looks exactly like her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.