Dhum Dhadaka Movie Actress Aishwarya Rane Spending her life in this way, Even film Industry Ignored | 'धूमधडाका' चित्रपटातील हि अभिनेत्री जगतेय हलाखीचं जगणं, इंडस्ट्रीलाही पडला त्यांचा विसर
'धूमधडाका' चित्रपटातील हि अभिनेत्री जगतेय हलाखीचं जगणं, इंडस्ट्रीलाही पडला त्यांचा विसर

प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ यांचा ‘वख्खा विख्खी वुख्खू’ हा डॉयलॉग तुम्हाला लक्षात असेलच. धुमधडाका या मराठी सिनेमातील हा गाजलेला डायलॉग. या सिनेमात अशोक सराफ प्रियतमा प्रियतमा म्हणत डान्स करत सीमाच्या मागे मागे असतात हेही आपण एन्जॉय केलं आहे. मात्र अशोक सराफ यांची हीच ऑनस्क्रीन ‘प्रियतमा सीमा’ सध्या रिअल लाइफमध्ये हलाखीचं जीणं जगत आहे. रुपेरी पडद्यावर सीमा साकारणा-या या अभिनेत्रीचं खरं नाव सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे असं आहे. 


धुमधडाकासह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह 'भटकभवानी' या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे. याशिवाय 'शराबी', 'नमक हलाल' अशा हिंदी सिनेमातही त्यांनी काम केलं आहे. अमिताभ बच्चन, निळू फुले, परवीन बाबी, जयश्री गडकर यांच्यासारख्या कलाकारांसह त्यांनी स्क्रीन शेअर केला आहे. मात्र बिग बींच्या 'मर्द' या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान त्या घोड्यावरुन पडल्या. या अपघातात त्यांच्या पाठीचे हाड मोडले ऐन भरात असलेल्या करिअरला अनपेक्षित ब्रेक लागला. या दुखण्याच्या उपचारापायी सुरेखा यांना आपलं मुंबईचं घरही विकावं लागलं. 

 


काम सुटलं, नातेवाईक अन् इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली. नियतीने त्यांच्यावर हलाखीचं जीणं जगण्याची वेळ आणली. चित्रपटसृष्टीत इतकं योगदान देऊनही तुटपुंजं पेन्शन मिळवून चरितार्थ चालवण्यासाठी सुरेखा राणे यांना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागले होते. अशा या हलाखीच्या परिस्थितीत कुणीही जवळचं नसल्याने सावंतवाडीत त्या एकट्याच राहतात. 


त्यामुळे चंदेरी दुनियते उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं, प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 


 

Web Title: Dhum Dhadaka Movie Actress Aishwarya Rane Spending her life in this way, Even film Industry Ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.