वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही आजही तितक्याच सुंदर दिसतात वर्षा उसगांवकर, त्यांचे पती आहेत प्रसिद्ध व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:00 AM2021-10-21T07:00:00+5:302021-10-21T07:00:00+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.

despite being her fifties Varsha Usgaonkar looks so beautiful, her husband is a famous person | वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही आजही तितक्याच सुंदर दिसतात वर्षा उसगांवकर, त्यांचे पती आहेत प्रसिद्ध व्यक्ती

वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही आजही तितक्याच सुंदर दिसतात वर्षा उसगांवकर, त्यांचे पती आहेत प्रसिद्ध व्यक्ती

Next

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे. आता वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही वर्षा उसगांवकर तितक्याच सुंदर दिसतात. आजही चाहते त्यांच्या सौंदर्यावर फिदा आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतेमध्ये माईंच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. वर्षा उसगांवकर यांचा नवरा लाइमलाइटपासून दूर राहतात.  

मराठी चित्रपटांसह हिंदी व राजस्थानी चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी अधिराज्य गाजविले आहे. बालपणापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. इतकेच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. आज देखील त्यांचे खूप फॅन फॉलोइंग आहे. मागील काही दिवसांपूर्वीच एका कोकणी चित्रपटात आणि पियानो फॉर सेल या नाटकात त्यांनी काम केले होते. 


अभिनेत्री वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवी शर्मा यांचे सुपुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले आहे. आपल्या पतीसोबत त्या अनेक फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये पहायला मिळाल्या आहेत. अजय व वर्षा यांच्या लग्नाला आता तब्बल २० वर्षे पूर्ण झाली आहेत. अजय शर्मा यांचे संपूर्ण कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. तर वर्षा यांचे वडील हे प्रसिद्ध राजकारणी होते. 
वर्षा उसगांवकर यांनी दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे आणि नितीन भारद्वाज यांच्यासोबत कित्येक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी गंमतजंमत, सगळीकडे बोंबाबोंब, खट्याळ सासू नाठाळ सून, हमाल दे धमाल, मजजाच मज्जा, भुताचा भाऊ, कुठं कुठं शोधू मी तिला, आमच्या सारखे आम्हीच, पसंत आहे मुलगी, शेजारी शेजारी, मुंबई ते मॉरिशस, एक होता विदूषक, ऐकावं ते नवलचं असे बरेच त्यांचे सिनेमे बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाले आहेत.

Web Title: despite being her fifties Varsha Usgaonkar looks so beautiful, her husband is a famous person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app