​मृण्मयी देशपांडेने सुव्रत जोशीशी केले लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2017 12:15 PM2017-06-23T12:15:53+5:302017-06-23T20:35:14+5:30

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने काहीच महिन्यांपूर्वी स्वप्निल राव सोबत लग्न केले आहे. मृण्मयीचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. तिच्या लग्नातील आणि ...

Deshpande married Suvrash Joshi? | ​मृण्मयी देशपांडेने सुव्रत जोशीशी केले लग्न?

​मृण्मयी देशपांडेने सुव्रत जोशीशी केले लग्न?

googlenewsNext
िनेत्री मृण्मयी देशपांडेने काहीच महिन्यांपूर्वी स्वप्निल राव सोबत लग्न केले आहे. मृण्मयीचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. तिच्या लग्नातील आणि रिसेप्शनचे काही फोटोज सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. तसेच मृण्मयीच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सिताऱ्यांनी धमाल केली होती. मेहंदी, संगीत, हळद आणि रिसेप्शन अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, शंकर महादेवन, पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, भुषण प्रधान अशा सेलिब्रेटीजनी मृण्मयीच्या लग्नाला चारचाँद लावले होते. तिच्या लग्नाला काहीच महिने झाले असताना तिने आता पुन्हा एकदा लग्न केले आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसेल का? हो, पण हे खरे आहे. मृण्मयीने पुन्हा लग्न केले असून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि तिने लग्न मराठी इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले आहे. मृण्यमयीने दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशीसोबत लग्न केले आहे. सुव्रतनेच त्यांच्या लग्नातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण सुव्रत आणि मृण्मयीचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले नाही तर एका चित्रपटातील दृश्यादरम्यानचे हे फोटो आहेत. शिकारी हा चित्रपट लवकरच येत असून या चित्रपटासाठी सुव्रत आणि मृण्मयी यांनी नुकतेच लग्नाच्या दृश्याचे चित्रीकरण केले. 
सुव्रतने शिकारी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत एक छानशी पोस्ट लिहिली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी लहान असताना चित्रपटात कोणाचे लग्न झाल्यास त्यांचे खऱ्या आयुष्यातही लग्न होते का हा प्रश्न मला पडायचा. तर मोठा झाल्यानंतर लोक येवढ्या धुमधडाक्यात लग्न का करतात हा प्रश्न मला पडायचा. यातील काही प्रश्नांचे उत्तर मला नुकतेच मिळाले. या वेड्या व्यक्तिसोबत चित्रीकरण करायला खूपच मजा आली. 

Web Title: Deshpande married Suvrash Joshi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.