Deepti Devi will be seen in Nagraj Manjule upcoming 'This' movie | दीप्ती देवी झळकणार नागराज मंजुळेंच्या आगामी 'ह्या' सिनेमात

दीप्ती देवी झळकणार नागराज मंजुळेंच्या आगामी 'ह्या' सिनेमात

ठळक मुद्देदीप्ती देवी दिसणार 'नाळ' चित्रपटात

हिंदी व मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दीप्ती देवीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. 'कंडिशन्स अप्लाय' व 'मंत्र' ह्या सिनेमात नुकतीच ती झळकली आहे. आता बऱ्याच दिवसानंतर मराठी चित्रपटात झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेची निर्मिती असलेल्या 'नाळ' सिनेमात दीप्ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 


'फँड्री' आणि 'सैराट' या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखीन एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. 'नाळ' असे या चित्रपटाचं नाव असून त्याची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहेत. या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. नागराज मंजुळेनेच त्याच्या फेसबुक अकाउंटवर हा टीझर  शेअर करून चित्रपटाविषयी माहिती दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी करणार आहे. माझ्याच मनातील गोष्ट सुधाकर सांगतोय... नितीन वैद्य, विराज लोंढे, निखिल वराडकर आणि प्रशांत पेठे निर्माणातील सोबती आहेतच अशी फेसबुकवर पोस्ट लिहीत नागराजने 'नाळ' विषयी सगळ्यांना सांगितले. 
'नाळ' चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाच्या कथेविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. या सिनेमातील कलाकारांबद्दल जाणून घेण्यास रसिक उत्सुक आहेत. अभिनेत्री दीप्ती देवीदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिच्या भूमिकेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. नाळ हा चित्रपट येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
नागराज मंजुळे सध्या 'झुंड' या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपट बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन महत्तवाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटावर सध्या नागराज काम करत आहे.

Web Title: Deepti Devi will be seen in Nagraj Manjule upcoming 'This' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.