मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सगळे सेलिब्रेटी क्वारंटाईन मोडमध्ये गेले आहेत. त्यात पुण्यातील घरी क्वारंटाईन असलेल्या भाग्यश्री मोटेने देखील नो मेकअप लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबतच तिने तिच्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

भाग्यश्रीने म्हटलं की, महत्त्वाच्या गोष्टी करण्याची हीच वेळ आहे. आता आपण सगळे घरात सुरक्षित आहोत आणि बरेच जण फूड एन्जॉय करत आहेत. काही जण असुरक्षित आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. या बातम्या खेदजनक आहेत. आपल्याला आता जो वेळ मिळाला आहे तो तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत व्यतित करा. बिझी शेड्युलमध्ये ज्या गोष्टी करायला मिळत नाहीत त्या करा.

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.

भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.

भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: Bhagyashree Mote Shared No Makeup Look, appeal to her fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.