'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एका रात्रीत रिंकू महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. रिंकूचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच तिच्याशी निगडीत काही गोष्टी जाणून घेऊयात.

रिंकू राजगुरूचे आई वडील दोघेही मराठी मीडियम शाळेत शिक्षक आहेत. रिंकूच्या लहानपणापासून ते दोघेही काम करत आहेत. त्यामुळे रिंकू स्वावलंबी आणि महत्त्वकांक्षी बनली. जर तिने एखादी गोष्ट करायचे मनाशी ठरविले की ती केल्याशिवाय राहत नाही, असे तिच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते.


रिंकूला खरं तर अभिनेत्री होण्यापूर्वी डॉक्टर व्हायचे होते. ती सांगते की, जर मी या क्षेत्रात आले नसते तर मी नक्कीच डॉक्टर झाले असते. सध्या रिंकू करिअरसोबतच तिचे शिक्षणही पूर्ण करते आहे. बिझी शेड्युलमधून वेळ काढून ती अभ्यास करत असते.रिंकूला डान्स करायला खूप आवडतो. बालपणापासून म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच ती कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय डान्स करते आहे. तिच्या डान्सचे नेहमी कौतूकही होते. तेव्हापासून ती शाळेत व महाविद्यालयात डान्समध्ये सहभाग घेते. तिने कोणतेही प्रोफेशनल डान्स ट्रेनिंग घेतलेले नाही. सैराटच्या ऑडिशनवेळीदेखील तिला डान्स सादर करायला सांगितला होता.रिंकू अष्टपैलू अभिनेत्री आहे. इतक्या लहान वयात ती यशाच्या शिखरावर आहे. त्यामुळे तिचे कौतूक करावं तितकं कमीच आहे. फार कमी लोकांना माहित आहे की रिंकूला गोड गळा लाभला असून ती गायनही करते. हे तिला तिच्या आजोबांकडून मिळाले आहे. तिचे आजोबा वेगवेगळे म्युझिकल इंस्ट्रुमेंट वाजवायचे आणि ती गायची. पण, तिने गायनाकडे फार लक्ष दिले नाही.रिंकू सातवी इयत्तेत शिकत असताना तिने सैराट सिनेमासाठी ऑडिशन दिले. पण, वर्षभरानंतर तिची या सिनेमासाठी निवड झाली. नववी इयत्तेत गेल्यानंतर तिने या सिनेमाचं शूटिंग सुरू केले. त्यामुळे ती वर्षभर शाळेत गेली नाही. मात्र सैराट सिनेमानंतर तिच्या आयुष्याला नवी भरारी मिळाली.

सैराटनंतर रिंकू कागर, मेकअप या सिनेमात झळकली. याशिवाय तिने हंड्रेड या वेबसीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केले. यात तिच्यासोबत अभिनेत्री लारा दत्ता मुख्य भूमिकेत होती. या व्यतिरिक्त आता ती नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकताना दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Birthday Special : Rinku Rajguru wanted to become a doctor TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.