बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ. वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना थोडक्यात अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकली नाही.

मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलताच भाव खाऊन गेली आहे. बिग बॉसचे दुसरं पर्व संपलं तरी अजूनही हिनाची चर्चा सुरू आहे.

हिना पांचाळने नुकताच इंस्टाग्राम अकाउंटवर बीचवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे.

हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.

हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.


विशेष म्हणजे २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटाच्या यादीत हिनाचा  समावेश होता.

हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते.

स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

Web Title: Bigg Boss Marathi 2 fame Heena Panchal sexy photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.