अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.

भाग्यश्रीनं नुकताच इंस्टाग्रामवर मराठमोळ्या साज शृंगार असलेला साडीतील फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.


भाग्यश्रीनं या फोटोत जांभळ्या रंगाची काठपदरी साडी नेसली आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या, कानात झुमके, नाकात नथ, बाजूबंद, गळ्यात नेकलेस आणि केसात फुलं माळून फोटोशूट केलं आहे. या फोटोंतून तिने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.


 भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने या चित्रपटातील लूकदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.


भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.  यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.


भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष भाग्यश्रीसाठी खास ठरणार आहे.


Web Title: Bhagyashree Mote shared saree picture on Instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.