मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीला लागला अनुष्काचा नाद, स्वतःला म्हणतेय 'वॉटर बेबी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 12:59 PM2019-09-21T12:59:07+5:302019-09-21T12:59:33+5:30

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माने बिकनीतील फोटो शेअर करत 'वॉटर बेबी' असं म्हटलं होतं. आता तिच्यानंतर मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीने स्वतःला वॉटर बेबी असं संबोधलं आहे,

Bhagyashree Mote shared picture and gave caption water baby | मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीला लागला अनुष्काचा नाद, स्वतःला म्हणतेय 'वॉटर बेबी'

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीला लागला अनुष्काचा नाद, स्वतःला म्हणतेय 'वॉटर बेबी'

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने बिकनीतील फोटो शेअर करत 'वॉटर बेबी' असं म्हटलं होतं. आता तिच्यानंतर मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिनेदेखील स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करीत स्वतःला 'वॉटर बेबी' असं संबोधलं आहे. 

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर ती नेहमी इंडियन, वेस्टर्न अशा लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंना खूप लाईक्स मिळत असतात. नुकताच तिने स्विमिंग पूलमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंना तिने 'वॉटर बेबी' असं कॅप्शन दिलं आहे.


 भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.  यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. 


 भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने या चित्रपटातील लूकदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.


भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत.

हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष भाग्यश्रीसाठी खास ठरणार आहे.

Web Title: Bhagyashree Mote shared picture and gave caption water baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.