Ashwini Bhavani celebrates 'Haa' Festival in America | अश्विनी भावेंनी अमेरिकेत सेलिब्रेट केला 'हा' फेस्टिवल

अश्विनी भावेंनी अमेरिकेत सेलिब्रेट केला 'हा' फेस्टिवल

ठळक मुद्देलग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं आहे. 

सध्या त्या कॉलिफोर्नियामध्ये 'हॉलोवेन फेस्टिवल' एॅन्जॉय करतायेत. कॉलिफोर्नियामधला  हा ऋतू बदलाचा काळ आहे. 'हॉलोवेन फेस्टिवल' याबदल बोलताना अश्विनी म्हणाल्या, ''झाडाची पाने रंग बदलत असतात आणि वातावरण आल्हाददायक असते.  फेस्टिव सिझनला हॉलोवेनने सुरूवात होते. महाराष्ट्रात जशी गणपती-नवरात्र-दसरा-दिवाळी ह्या सणाांची लगबग सुरू होते, तशीच लगबग इथे हॉलोवेनपासून सुरू होते हॉलोवेननंतर थॅंक्सगिविंग, ख्रिसमस आणि मग नववर्षापर्यंत सर्वत्र सळसळता उत्साह असतो. हॉलोवेनच्यावेळी जेवढी भीतीदायक सजावट करता येईल. तेवढी करण्यामागे प्रत्येकाचा भर असतो. मुलांची तर चंगळ असते. प्रत्येकाला ज्या ज्या घरी जातील. तिथून कॅन्डीज मिळतात. '' 

पुढे त्या म्हणाल्या, ''आमच्याकडे 'पमकिन फेस्टिवल' झाला. त्यामध्ये वेगवेगळ्या लहान-मोठ्या आकाराचे भोपळे विकायला असतात. तो अनुभवण्यासरखा असतो. हॉलोनिसाठी दारापूढे सजवायला तिथून मी काही भोपळे घेऊन आले. मी दरवर्षी माझ्या कुटूंबासोबत हॉलोवेन सेलिब्रेट करते. माझी मुलं लहान होती, तेव्हाची एक आठवण आहे. मस्ती म्हणून त्यांना मी हडळीसारखा आवाजकाढून किंवा हसून दाखवायचे. तेव्हापासून आजतागायत ती दोघंही त्या विशिष्ठ आवाजाला एवढी घाबरतात. की, मला तसा आवाज न काढण्याची सक्त ताकिद देतात.''


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ashwini Bhavani celebrates 'Haa' Festival in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.