Ashvini Bhave shares her fan moment with Hollywood actress Judi Dench | अश्विनी भावे यांचा फॅन मोमेंट सेल्फी ठरतोय लक्षवेधी
अश्विनी भावे यांचा फॅन मोमेंट सेल्फी ठरतोय लक्षवेधी

सोशल मीडियावर बॉलिवूड असो किंवा मग मराठी चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात.यांत सतत अॅक्टीव्ह असणाऱ्यांच्या यादीत अश्विनी भावे यांचंही नाव मोडले जाते. त्या अमेरिकेत राहत असल्यामुळे चाहत्यांसह कनेक्ट राहण्यासाठी त्या सगळ्या अपडेट शेअर करत  असतात. सध्या त्यांचा असाच  एक फॅन मोमेंट सेल्फी लक्षवेधी ठरतो आहे. कारण या सेल्फीची बातच काही खास आहे. हॉलिवूडमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री जुडी डेंन्च यांच्या बरोबर त्यांनी हा खास सेल्फी आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर केला आहे. लंडन एअरपोर्टवर अचानक त्यांना त्यांच्या जुडी डेंन्च दिसल्या त्यांना पाहून अश्विनी खूप खूश झाल्या. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला असे समोर पाहून त्यांनी लगेचच त्यांची भेट घेतली. याच खास भेटीची खास आठवण सदैव जवळ असावी म्हणून कॅम-यात क्लिक करत त्यांनी आपला हा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. जुडी डेंन्च यांना भेटून अश्विनी यांचा आनंदही नक्कीच गगनात मावेनासा झाला हे मात्र नक्की.

अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी प्रेम, मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेले नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते. शहरी भागातून लोप पावत जाणारी हीच मराठी अंगण संस्कृती अभिनेत्री अश्विनी भावे यांनी परदेशात जोपासली आहे.

परसातली भाज्या ही पारंपरिक पद्धती त्यांनी अमेरिकेतही जिवंत ठेवली आहे. त्यांचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत यशस्वीरित्या सुरु आहे. याचा माहिती आपल्या रसिकांना आणि प्रत्येक नागरिकाला कळावी यासाठी अश्विनी भावे यांनी फेसबुकवर द ग्रीन डोअर हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून त्या आपल्या प्रत्यक्ष जीवनात घरी राबवल्या जाणा-या परसातल्या भाज्या या उपक्रमाची माहिती रसिकांशी शेअर करत असतात. अश्विनी भावे यांनी अमेरिकेत त्यांच्या घराच्या मागच्या कुंपणामध्ये वेगवेगळी फळं, फुलं आणि भाज्यांची बाग फुलवली आहे. 

 


Web Title: Ashvini Bhave shares her fan moment with Hollywood actress Judi Dench
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.