Ashok Saraf Birthday Special: आजही या कलाकारांच्या आठवणीने भावुक होतात अशोक सराफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 12:31 PM2021-06-04T12:31:37+5:302021-06-04T12:40:03+5:30

अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

Ashok Saraf Birthday Special: ashok saraf missing his costar laxmikant berde and sudhir joshi | Ashok Saraf Birthday Special: आजही या कलाकारांच्या आठवणीने भावुक होतात अशोक सराफ

Ashok Saraf Birthday Special: आजही या कलाकारांच्या आठवणीने भावुक होतात अशोक सराफ

googlenewsNext
ठळक मुद्देअशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकापासून केली आणि पुढे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले.

अशोक सराफ यांचा आज म्हणजेच ४ जूनला वाढदिवस असून त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी करण अर्जुन, यस बॉस यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.


अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिका असलेले अनेक चित्रपट गाजले आहेत. लक्ष्मीकांत, सुधीर जोशी यांनी अशोक सराफ यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. त्यांच्या दोघांचेही विनोदाचे टायमिंग खूप छान होते असे ते सांगतात. या दोघांनाही मी खूप मिस करतो असे त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. 

अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकापासून केली आणि पुढे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले. त्यांचे काम प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी तर फार प्रसिद्ध होती. या दोघांची जोडी म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाकाच असायचा. असा हा डबल धमाका निदान अजून तरी कोणी देऊ शकलेले नाही. विनोदी सिनेमे म्हटले की आपसुकच अशोक सराफ डोळ्यांसमोर येतात. आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ते मराठी सुपरस्टार आहेत. अशोक सराफ यांनी विनोदी तसेच गंभीर भूमिका पण साकारल्या आहेत.

Web Title: Ashok Saraf Birthday Special: ashok saraf missing his costar laxmikant berde and sudhir joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.