ठळक मुद्देपुण्यातल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात आरोहचा जन्म झाला.  आरोह हा अभियंता आहे.

मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) सध्या सोशल मीडियामुळे त्रस्त झालाये, असे म्हटले तर वावगे होणार नाही. होय, एका अज्ञात हॅकरने आरोहचे फेसबुक अकाऊंट हॅक केले. इतकेच नाही तर त्याचा एक मॉर्फ व्हिडीओ तयार करून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर फोनवरून आरोहला धमक्याही मिळाल्यात. आरोहने स्वत: पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. आरोहने याबाबत पुणे पोलिसांकडे तक्रार केली असून  सायबर गुन्हे विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. (Aroh Welankar Facebook account gets hacked)

माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले असून कोणीतरी त्यावरून फोटो व व्हिडीओ पाठवत आहे. मला फोन येत आहे, असे इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये आरोहने म्हटले आहे.

फेसबुकवरूनच हॅकरला आरोहचा नंबर मिळावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आरोहने आपल्या चाहत्यांना काही सल्लेही दिले आहे. अज्ञात कॉल घेऊ नका, कोणाशी बोलता याची काळजी घ्या. एखादा हॅकर तुमच्या माहितीचा गैरवापर करू शकतो. तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतो. असा प्रकार घडल्यास सर्वप्रथम पोलिसांशी संपर्क साधा, असे त्याने म्हटले आहे.

पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात आरोहचा जन्म झाला.  आरोह हा अभियंता आहे. पण आता ती ओळख कधीच मागे पडली आहे. आता तो अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण या क्षेत्रात तो अपघानाने आला. मेकॅनिकल इंजीनिअरिंग करत असताना कल्चरल ग्रूपमध्ये ओपनिंग आहे असे त्याला कळले आणि तिथून महाविद्यालयीन अभिनयाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्याला नाटकांनी असे काही वेड लावले की, त्याने  स्वत:ला अभिनयाला वाहून घेतले. 2012 मध्ये ‘रेगे’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्याला मिळाली आणि  या चित्रपटामुळे  आरोह वेलणकर  हे नाव सर्वपरिचित झाले. त्यानंतर तो ‘घंटा’ या सिनेमात दिसला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aroh Welankar to file a police complaint after his Facebook account gets hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.