पहिल्याच सिनेमामुळे एका रात्रीत लोकप्रिय झाले परशा आणि आर्ची, सध्या करताहेत हे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 18:05 IST2020-04-29T18:04:54+5:302020-04-29T18:05:43+5:30
सैराट रिलीज होऊन चार वर्षे झाले असतानाही आजही रिंकू व आकाश यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे.

पहिल्याच सिनेमामुळे एका रात्रीत लोकप्रिय झाले परशा आणि आर्ची, सध्या करताहेत हे काम
परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटातून रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. सैराट रिलीज होऊन चार वर्षे झाले असतानाही आजही रिंकू व आकाश यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे.
सैराट चित्रपटामुळे आकाशला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटासाठी त्याने तब्बल १३ किलो वजन घटविले. या चित्रपटानंतर आकाश महेश मांजरेकर दिग्दर्शित फ्रेंडशीप अनलिमिटेड चित्रपटाच झळकला.या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तो नेटफ्लिक्सच्या लस्ट स्टोरिजमध्ये अभिनेत्री राधिका आपटेसोबतही पहायला मिळाला. या सीरिजमधील त्याच्या कामाची प्रशंसा झाली.
सैराटमुळे तरुणाई जणू काही आर्ची नावाचा जप करू लागली. या सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली.
रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. या चित्रपटानंतर रिंकू कागर, मेकअप या मराठी चित्रपटात झळकली. नुकतीच तिची 100 ही हिंदी वेबसीरिज हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. या सीरिजमधील रिंकूच्या कामाचं खूप कौतूक होत आहे.