आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना केलं घायाळ, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:30 AM2019-09-29T06:30:00+5:302019-09-29T06:30:00+5:30

रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Archie aka Rinku Rajguru's glamorous look wounds fans, See Photos | आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना केलं घायाळ, See Photos

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना केलं घायाळ, See Photos

googlenewsNext


'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. 

नुकताच रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.


काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.

सैराटमुळे तरुणाई जणू काही आर्ची नावाचा जप करू लागली. या सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. आता तर रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आता तिचा मेकअप हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
 

Web Title: Archie aka Rinku Rajguru's glamorous look wounds fans, See Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.